Please wait...


निबंधस्पर्धा - जुलै २०२१

Organized by रा. स्व. संघ कोकण प्रांत


Groups

1

Participants

62

Webapge Views

2308





  • How to download receipt


  • How to pay competition fees


  • How to download receipt


  • How to pay competition fees


About Competition

सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये समाजात एक औदासिन्याची भावना बळावते आहे. नकारात्मकतेची तसेच शारीरिक आणि बौद्धिक निष्क्रियतेची अवस्था निर्माण झाली आहे. तेव्हा वेळेचा सदुपयोग व्हावा, सकारात्मक विचारमंथन व्हावं आणि आपल्यातील सर्जनशीलतेला उद्युक्त करावं यासाठी आपण निबंधस्पर्धा आयोजित करित आहोत.

निबंध विषय -

कुटुंब प्रबोधन शीर्षक

  1. कुटुंब संस्थेपुढील आव्हाने आणि उपाय
  2. आदर्श हिंदू घर
  3. भारतीय कुटुंब व्यवस्था.
  4. संस्कारीत कुटुंब - सुखी व आनंदी कुटुंब
  5. आपले घर एक पाठशाळा

पर्यावरण शीर्षक

  1. हिंदू संस्कृती आणि पर्यावरण
  2. आपले सण आणि पर्यावरण
  3. प्लास्टिक मुक्त भारत
  4. पर्यावरण विकास व आत्मनिर्भर भारत
  5. भारतीय जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धन
  6. माझे घर पर्यावरणयुक्त होण्यासाठी योगदान

सामाजिक समरसता शीर्षक

  1. संत साहित्य आणि समरसता
  2. समरसता एक मूल्य
  3. समरस समाज निर्मितीसाठी आपले योगदान
  4. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर- एक राष्ट्रीय नेतृत्व

स्पर्धेचे नियम व अटी: -

  • १ जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२१ ह्या एक महिन्याच्या कालावधीत निबंध लिहून पाठवावेत. अंतिम दिनांक ३१ जुलै २०२१.
  • निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत लिहिता येईल.
  • ही स्पर्धा वय १५ वर्षावरील सर्वांसाठी खुली आहे. विभागातील सर्व स्वयंसेवकांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी यात भाग घ्यावा
  • निबंध ८०० ते १५०० शब्दांचा असावा.
  • निबंधातील विचार, विषयाची मुद्देसूद मांडणी, विषयाला दिलेलं महत्त्व, योग्य वाक्यरचना, भाषासौंदर्य इत्यादी निकषांवर निबंधाचं परिक्षण केलं जाईल.
  • निबंधावर नाव,पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आणि विषय यांचा उल्लेख असावा.
  • निबंध लिहून त्याचा फोटो काढून किंवा गुगल व्हॉइस टायपिंग करून किंवा निबंधाची पीडीएफ फाईल खालील दुव्यावर अपलोड करा. किंवा टायपिंग केलेली सॉफ्ट कॉपी खालील दुव्यावर अपलोड करा.
    https://myspardha.com/rsskokanessay/
  • उत्कृष्ट निबंधाचं संकलन केलं जाईल.
  • परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल. त्यात बदल होणार नाही.
  • मायस्पर्धावर आपला निबंध अपलोड करण्यासाठी कृपया खालील चरणांचे अनुसरण करा.
  • पृष्ठावरील Participate बटणावर क्लिक करा.
  • जर आपले खाते असेल तर आपल्या क्रेडेन्शियल्ससह लॉगिन करा. आपल्याकडे मायस्पर्धा खाते नसल्यास कृपया साइन अप वर क्लिक करा व आवश्यक तपशील भरा.
  • मग सहभाग फॉर्म उघडेल. कृपया आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि आपली निबंध फाइल अपलोड करा आणि आपला सहभाग पूर्ण करण्यासाठी शेवटच्या चरणातील फिनिश बटणावर क्लिक करा.


अधिक माहितीसाठी संपर्क: -

  1. श्री. विजय कऱ्हाडे ९९६९०२०२४६
  2. श्री उदय शेवडे ९४२११६३६७०

Basic Information

Organized by :
रा. स्व. संघ कोकण प्रांत
Competition Start Date :
01-07-2021
Competition Start Time :
12:00 AM
Competition Platform :
Online
Online Registration End Date :
31-07-2021

Facilities

Facilities information not provided.

Message Organizer

Communicate with organizer You can drop your message/query to organizers of this competition.




Competition Groups

Group Name Open
Age Group Above 15
Gender All
Start Date 01-07-2021
End Date 31-07-2021
Rules DOWNLOAD Rules
Fees No Participation Fees
Coordinator
Name Email Contact Number
श्री. विजय कऱ्हाडे Not Provided 9969020246
श्री उदय शेवडे Not Provided 9421163670

No ranking information provided.

COMPETITION SUMMARY

नमस्कार,

कोकण प्रांताच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत आपण भाग घेतल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन !

अशा प्रकारची निबंध स्पर्धा संघातर्फे प्रथमच घेतली गेली. स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला.

खरंतर स्पर्धा संघाच्या कोकण प्रांतापुरती मर्यादित होती पण सामाजिक माध्यमावर स्पर्धेची माहिती गेल्यामुळे महाराष्ट्रातून नव्हे सलगच्या शासकीय राज्यांतूनही प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्हीही असा विचार केला की लेखकांच्या उत्साहावर विरजण घालणं योग्य नाही.

स्पर्धेसाठी पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन या तीन विषयांची निवड केली व काही शीर्षके सुचवली होती त्यानुसार सर्वांनी आपल्या लेखनाला अतिशय चांगला न्याय दिला आहे असे म्हणावेसे वाटते.

आम्ही विषयागणिक तीन क्रमांक काढले आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ₹ ११००/- , ₹ ७५०/- आणि ₹ ५००)- रुपयाची पुस्तके दिली जातील.

या निमित्ताने विचार आणि लेखन प्रक्रिया आपणा सर्वांमध्ये सुरू झाली ती अशीच सुरू राहिली पाहिजे. आज व्यक्त होण्याची अनेक साधने उपलब्ध झाली असताना देश, समाज आणि भवताल याबद्दल व्यक्त होणं हे जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. आयोजकांना आशा आहे ही प्रक्रिया आपण अशीच पुढे सुरू ठेवाल.

कोरोनाच्या स्थितीमुळे प्रत्यक्ष बक्षीस समारंभ होऊ शकणार नाही व त्यामुळे आपली भेट होऊ शकणार नाही ह्याची बोच लागून राहणार आहे. यथावकाश स्थानिक संघ अधिकाऱ्यांतर्फे आपले बक्षीस आपल्यापर्यंत पोहोचते करण्याचा मानस आहे.

पुन्हा एकदा आपण सहभाग घेतल्याबद्दल आपले आयोजकांच्या वतीने अभिनंदन करतो.

आयोजक,

कोकण प्रांत, रा. स्व. संघ

COMPETITION WINNERS

दीपिका दीक्षित-तांबेकर

Please wait...